iPhone 7 वर 19 हजार 800 रूपयांचं बंपर डिस्काउंट

By admin | Published: June 11, 2017 02:27 PM2017-06-11T14:27:56+5:302017-06-11T14:28:32+5:30

अॅपल iPhone 7 वर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडून बंपर ऑफर देण्यात येत आहे. एकीकडे अॅमेझॉन iPhone 7 वर 17 हजार रूपयांची सूट देत आहेत तर आता पेटीएमनेही एक विशेष ऑफर आणली आहे.

19,800 bumper discount on iPhone 7 | iPhone 7 वर 19 हजार 800 रूपयांचं बंपर डिस्काउंट

iPhone 7 वर 19 हजार 800 रूपयांचं बंपर डिस्काउंट

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - अॅपल  iPhone 7 वर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडून बंपर ऑफर देण्यात येत आहे. एकीकडे अॅमेझॉन  iPhone 7 वर 17 हजार रूपयांची सूट देत आहे, तर आता  पेटीएमनेही एक विशेष ऑफर आणली आहे.  
 
60,000 रुपयांचा  iPhone पेटीएमवर  45,960 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या फोनवर  14,040 रुपयांचं डिस्काउंट देत आहे. तसेच युजर प्रोमो ऑफर अंतर्गत 5 हजार 750 रूपयांची कॅशबॅक ऑफरही आहे. म्हणजे दोन्ही ऑफर मिळून 19 हजार 790 रूपायांचं डिस्काउंट मिळणार आहे. कॅशबॅकचे पैसे 24 तासांच्या आता युजरच्या खात्यात जमा केले जाणार आहे. 
 
ही स्पेशल ऑफर केवळ  iPhone 7 च्या 32जीबी व्हेरिअंटवर उपलब्ध आहे. मात्र ही ऑफर किती दिवसांसाठी आहे याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.   
 
आयफोन 7ची वैशिष्टये-
आयफोन 7ला 4.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच आयफोन 7मध्ये हेडफोन जॅकची सुविधा देण्यात आली नसून वायरलेस हेडफोननेच आयफोन 7 कनेक्ट होणार आहे. आयफोन 7मध्ये सुधारित 12 मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन 7मध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए10 चिफ बसवण्यात आली असून, 3 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. तसेच 2.37GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं सेन्सिटीव्ही होम बटण देण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोन ऑपरेटिंग करताना सुपरफास्ट चालणार आहे. या आयफोन 16 जीबीची किंमत 43 हजारांच्या घरात आहे. तर 32 जीबीच्या आयफोन 7ची किंमत 53 हजारांपर्यंत असणार आहे.
 
 - आयफोन ७ मध्ये IOS 10 सिस्टीम आहे,  ते IOS 9 चे अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे मोबाईलला फारसा फायदा होत नाही. 
 
- आयफोन ७ विकत घेणा-या अनेकांनी सिग्नल ड्रॉप आणि जीपीएस व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 
 
- गुगल मॅप वापरताना नो सिग्नल आयकॉन दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे,. 
 
-आयफोन ७ मध्ये जे नवे फिचर्स आहेत त्याला जास्तीत जास्त बॅटरी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात बॅटरीची समस्या देखील उदभवू शकते. आयफोन ७ ची बॅटरी आयफोन ६ च्या तुलनेत एक ते दोन तासच जास्त चालू शकते. 
 
 
- आयफोन ७ च्या रॅममध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, आयफोन ६ एस प्रमाणेच २ जीबी रॅम देण्यात आली आहे. 
 
- अॅपलने नव्या आयफोन ७ मध्ये वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. या इअरपॅडसच्या चोरी होण्याची शक्यता अधिक आहे. 
 
 - तुम्ही तुमच्या संगणकावरुन गाणी, फिल्म, व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये Transfer  करु शकता. पण आयफोनमध्ये सुलभतेने हे Transfer करता येत नाही. त्यासाठी आय टयुन्स सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर असणे आवश्यक आहे. 
 
 - सध्याचे बहुतेक मोबाईल डयुअल सीम आहेत. पण आयफोन अजूनही सिंगल सीम आहे. त्यामुळे काही आयफोन युझर्सना दुसरा फोनही सोबत कॅरी करावा लागतो. 

Web Title: 19,800 bumper discount on iPhone 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.