१९९३ साखळी बॉम्बस्फोट खटला: दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची मुक्तता, अजमेर टाडा कोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:01 PM2024-02-29T14:01:35+5:302024-02-29T14:02:10+5:30
1993 serial blasts case: अजमेर येथील टाडा कोर्टाने १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची मुक्तता केली आहे. त्याशिवाय अन्य दोन आरोपी इरफान आणि हमिदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टुंडा हा सध्या अजमेर येथील कारागृहात बंद आहे.
अजमेर येथील टाडा कोर्टाने १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची मुक्तता केली आहे. त्याशिवाय अन्य दोन आरोपी इरफान आणि हमिदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टुंडा हा सध्या अजमेर येथील कारागृहात बंद आहे.
१९९२ मध्ये अयोध्येमधील बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर १९९३ मध्ये कोटा, लखनौ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई येथे ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणामध्ये टुंडा हा आरोपी होता. दरम्यान, टुंडा याची नेमक्या कुठल्या आधारावर मुक्तता करण्यात आली, असा प्रश्न सरकारी वकिलांना विचारला असता त्यांनी निकाल पाहिल्यानंतर त्याबाबत काही टिप्पणी करता येईल, असं सांगितलं.
या बॉम्बस्फोटांमागचा मास्टर माईंड हा टुंडा हाच असल्याचा सीबीआयचा दावा होता. तसेच २०१३ मध्ये त्याला नेपाळच्या सीमेजवळून अटक करण्यात आली होती. टुंडा याच्यावर दहशतवादी कारवायांप्रकरणी देशातील विविध ठिकाणी खटले सुरू आहेत. तरुणांना भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा टुंडावर आरोप आहे. तसेच १९९८ च्या गणेशोत्सवादरम्यान, त्याने जुनैद या पाकिस्तानी नागरिकासोबत मिळून दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचाही आरोप आहे.