PM Modi: वर्षभरात १०० देशांना कोरोना लस पुरवली, फार्मा क्षेत्रात जगात भारताचाच डंका- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:39 PM2021-11-18T18:39:15+5:302021-11-18T18:40:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी फार्मा क्षेत्रातील पहिल्यावहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उदघाटन केलं. यात पंतप्रधान मोदींनी भारतानं गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केला असल्याचं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी फार्मा क्षेत्रातील पहिल्यावहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उदघाटन केलं. यात पंतप्रधान मोदींनी भारतानं गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केला असल्याचं म्हटलं. "गेल्या वर्षभरात आपण जवळपास १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटीहून अधिक डोस निर्यात केले आहेत. तसंच येत्या काळात जसजशी आपली उत्पादन क्षमता वाढेल त्यासंदर्भात आपण आणखी मोठं लक्ष्य गाठू शकणार आहोत. भारतीय आरोग्य क्षेत्रावरील जगानं दाखवलेल्या विश्वासामुळे आज फार्मा क्षेत्रात भारताचाच डंका आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"भारतानं २०१४ नंतर आरोग्य सेवा क्षेत्रानं परदेशी गुंतवणूकीतील १२ बिलियन अमेरिकी डॉलरचं लक्ष्य गाठलं आहे. भारताला चिकित्सा उपकरणं आणि औषधांच्या संशोधनामध्ये अव्वल स्थान गाठून देण्यासाठीच्या दृष्टीकोनातून काम करायचं आहे", असंही मोदी म्हणाले.
LIVE: PM Shri @narendramodi inaugurates 1st Global Innovation Summit of Pharmaceutical sector. https://t.co/Xteg6KtxZr
— BJP (@BJP4India) November 18, 2021
जागतिक कंपन्यांना दिलं भारतात येण्याचं आमंत्रण
उद्योगाच्या मागणीनुसार नियमकांच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या साच्यात बदल करण्यासाठीच्या मुद्द्यावर आम्ही नक्कीच संवेदनशील आहोत. त्यादृष्टीनं सकारात्मकरित्या काम केलं जात आहे. आरोग्य क्षेत्रात आणखी मजबूती येण्यासाठी औषधं आणि लसींसाठीचा कच्चामाल देशातच निर्माण करण्याचं कार्य वेगानं केलं पाहिजे. सर्व जागतिक कंपन्यांना माझं आवाहन आहे की भारतात येऊन काम करावं तसंच इथं येऊन संशोधन करावं त्यासाठी सर्व सहकार भारत सरकार करेल", असं मोदी म्हणाले.