देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:36 PM2020-08-28T15:36:50+5:302020-08-28T15:39:14+5:30

सोशल मीडियावर बिलासंदर्भात एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. 

1st september electricity bill waiver scheme starts is fake news | देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक मेसेज हे वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. त्यामुळे काहींना भरमसाठ वीजबिल येत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर बिलासंदर्भात एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. 

1 सप्टेंबरपासून वीज बिल माफ होणार असे काही मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत असल्याचं सांगितलं आहे. तसेच सप्टेंबरपासून वीज बिल माफ केले जाईल असा दावा केला जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता. त्याबाबतचं सत्य समोर आलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. फॅक्ट चेकमध्ये सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही असं सांगण्यात आलं आहे. वीज बिलाची बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा देखील पीआयबीने दिला आहे. त्यामुळे व्हायरल होण्याऱ्या खोट्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवून नये. 

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अनेक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे पालिकेला दीड लाख रुपये मिळतात असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना रुग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्यामुळे हा सर्व धंदा सुरू झाला आहे, अशी ऑडिओ क्लिप प्रसारित होत आहे. मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; मात्र असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं

"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित', पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

Web Title: 1st september electricity bill waiver scheme starts is fake news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.