छत्तीसगडमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा; दोन जवान शहीद, 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 03:27 PM2020-02-10T15:27:04+5:302020-02-10T15:41:53+5:30
छत्तीसगडमधील बिजापूर येथे कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
बिजापूर - छत्तीसगडमधील बिजापूर येथे सोमवारी (10 फेब्रुवारी) कोब्रा बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील इरापल्ली गावात ही चकमक झाली. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
परिसरात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. सोमवारी सकाळी कोब्रा बटालियनचे जवान शोधमोहीम राबवत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले आहेत.
#UPDATE Chhattisgarh: Two CoBRA personnel of 204 battalion have lost their lives in the encounter with naxals at Irapalli village in Bijapur district. https://t.co/jFb2zHaKIb
— ANI (@ANI) February 10, 2020
झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या लातेहारसह आसपासच्या परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या, वॉन्टेड आणि ज्यांच्यावर लाखोंचे बक्षीस असलेल्या 27 नक्षलवाद्यांचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वी लातेहार पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या सर्वांवर 1 लाखांपासून ते तब्बल 25 लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. लातेहार पोलिसांकडून ज्या 27 नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत. अलीकडेच पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी छतरपूर अनुमंडल येथून या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
LICपाठोपाठ 'या' सरकारी कंपनीची भागीदारी विकणार मोदी सरकार, मिळवणार 1 हजार कोटी
Breaking : SC/ST अॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Hinganghat Burn Case : 'असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा करू'
Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख