हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान दोघानांही हौतात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 01:06 PM2023-06-16T13:06:18+5:302023-06-16T13:06:51+5:30
दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.
झारखंडमधील सीआरपीएफच्या मुसाबनी झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी जवानांना तातडीने इस्तिपतळात दाखल केले. पण दुर्देवाने दोन्ही जवानांची प्राणज्योत मालवली. खरं तर मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.
मृत सीआरपीएफचे जवान गुरूवारी दुपारी ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान दोन्ही जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी सीआरपीएफ १३३ च्या बटालियन मणिपुरचे जवान प्रेम कुमार सिंह आणि ७व्या बटालियनचे गिरिडीहमधील बक्सर, बिहार येथील रहिवासी असलेल्या शंभू राम गौर यांना जमशेदपूरच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.
२ जवानांचा मृत्यू
जमशेदपूरातील रूग्णालयात उपाचारादरम्यान गुरूवारी दुपारी या जवानांचा मृत्यू झाला. १.३० वाजता प्रेम कुमार सिंह आणि ३.३० वाजता शंभू राम गौड यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन्ही जवानांचा मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करून जवानांच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांनी कोणताही शारीरिक व्यायाम केला नव्हता.
२००१ आणि २००५ मध्ये भर्ती झाले होते जवान
झारखंडच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये एकूण १९ बटालियनचे जवान प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत. इथे ४५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये नक्षलवाद्यांविरूद्धचा लढा याचे ट्रेनिंग दिले जाते. जवान प्रेम कुमार २००१ मध्ये तर शंभू कुमार २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाला होता.