पायाभूत सेवा-सुविधा क्षेत्रासाठी 2 लाख 11 हजार 246 कोटी - जेटली
By admin | Published: February 29, 2016 11:59 AM2016-02-29T11:59:37+5:302016-02-29T15:45:07+5:30
पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थमंत्री अ्रूण जेटली यांनी बजेट 2016 - 17 मध्ये 2 लाख 11 हजार 246 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थमंत्री अ्रूण जेटली यांनी बजेट 2016 - 17 मध्ये 2 लाख 11 हजार 246 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केली आहे. निव्वळ रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून 97 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 15 हजार कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभे करणार असल्याचे जेटली म्हणाले.
बंद पडलेल्या 85 टक्के रस्त्यांचे काम मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते व महामार्गांसाठी 55 हजार कोटींची तरतूद, यावर्षी 10 हजार किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग उभारणार असल्याचे जेटली यांनी सांगितले. पंतप्रधान ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातू रस्त्यांसाठी होणारा एकत्रित खर्च 97 हजार कोटी रुपये असेल.