माल्दामधून 2000 रुपयांच्या 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Published: February 17, 2017 04:51 PM2017-02-17T16:51:51+5:302017-02-17T16:51:51+5:30
बीएसएफनं दोन हजार रुपयांच्या दोन लाखांच्या बनावट नोटा पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यातून पकडल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
पश्चिम बंगाल, दि. 17 - बीएसएफनं दोन हजार रुपयांच्या दोन लाखांच्या बनावट नोटा पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यातून पकडल्या आहेत. भारत-बांगलादेश सीमेवरून या बनावट नोटा पश्चिम बंगालमार्गे भारतात येत असतानाच बीएसएफनं ही कारवाई केली आहे.
बीएसएफच्या माहितीनुसार, चुरियांतपूर येथे या बनावट नोटांची तस्करी होत असल्याची माहिती बीएसएफला मिळाली. त्यानंतर लागलीच त्यांनी सापळा रचला. त्यावेळी भारताकडून काही तस्कर बांगलादेशच्या सीमेपलीकडून संशयास्पदरीत्या वस्तूंची देवाणघेवाण करत असल्याचं आढळून आले. बीएसएफच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पॅकेट तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
तत्पूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवरील माल्दा आणि मुर्शिदाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. 8 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणाकडून 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा जप्त करून त्याला अटक केली होती. 2 हजारांच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांवर वॉटरमार्कसह फीचर्स कॉपी करण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटा ओळखणं अवघड जातं असल्याचंही बीएसएफच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे.
West Bengal: Border Security Force seized Rs 2 lakh worth fake notes of Rs 2000 in Malda. pic.twitter.com/4UnwqIDMZ8
— ANI (@ANI_news) February 17, 2017