२ खून, आत्महत्या; पोलीसही चक्रावले, पत्नी, सासूच्या हत्येनंतर त्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:15 AM2020-06-24T02:15:13+5:302020-06-24T02:16:17+5:30

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वेगळी राहत असलेल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

2 murders, suicides; Police also chakravale, his wife, mother-in-law after the murder of his suicide | २ खून, आत्महत्या; पोलीसही चक्रावले, पत्नी, सासूच्या हत्येनंतर त्याची आत्महत्या

२ खून, आत्महत्या; पोलीसही चक्रावले, पत्नी, सासूच्या हत्येनंतर त्याची आत्महत्या

Next

कोलकाता : कोलकात्यामध्ये एकाने आपल्या सासूची हत्या केली व नंतर आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वेगळी राहत असलेल्या पत्नीची हत्या केली होती. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहेत. अमित अग्रवाल (४२), याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते की, त्याने बंगळुरूमध्ये पत्नी शिल्पीची हत्या केली होती व नंतर सोमवारी तो कोलकाता येथे आला होता. तेथे आपल्या मुलाला भावाच्या घरी सोडून तो फूलबाग भागातील सासुरवाडीत भेटण्यासाठी आला होता. तेथे त्याने ६० वर्षीय सासूची हत्या केली होती. यावेळी त्याचे सासरे तेथून कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याने हत्या व आत्महत्येसाठी वापरलेले शस्त्रही जमिनीवर पडले होते.
बंगळुरूमध्ये व्हाईटफील्ड फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह मिळाला होता व तो नष्ट होण्याच्या अवस्थेत होता. मृतदेह पोलिसांना मिळण्यापूर्वी ४८ तास आधी तिचा खून झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. या हत्येच्या वेळी अमित नेमका कोठे राहत होता, याचाही पोलीस तपास करीत आहेत.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल दाम्पत्य दोन वर्षांपूर्वी वेगळे राहिले होते व त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दोघेही चार्टर्ड अकाऊंटंट होते.

Web Title: 2 murders, suicides; Police also chakravale, his wife, mother-in-law after the murder of his suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.