उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 11:07 IST2022-09-24T10:30:17+5:302022-09-24T11:07:46+5:30
अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मध्यरात्री अचानक स्फोट झाला. यात कारखान्यात असलेल्या २ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २ जणांचा मृत्यू
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अमरोहमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मध्यरात्री अचानक स्फोट झाला. यात कारखान्यात असलेल्या २ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.
सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ
जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. कारखान्याचा मालक फरार झाला आहे. हा बेकायदेशीर फटाका कारखाना अमरोहाच्या गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्लीपूर गावाजवळ आहे.फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे कारखान्याचे पत्रे उडून गेले. हा स्फोट एवढा भीषण होता की, छतासोबतच भिंतही कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये कारखाना मालकाचा मुलगा आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
रुग्णालयात दाखल केलेल्या दोघांची स्थिती गंभीर आहे. कारखान्यात काम करणारे कामगार अजुनही गायब आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.