२ विद्यार्थ्यांची काेटा येथे आत्महत्या; एक लातूरचा विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:24 AM2023-08-29T07:24:48+5:302023-08-29T07:25:16+5:30
कासले याच्या मृत्यूनंतर चार तासांनी नीटची तयारी करत असलेल्या आदर्श राज (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोटा : ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पहिली पायरी अशी ओळख असलेल्या राजस्थानमधील कोटा शहरात गेल्या २४ तासांमध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी एक विद्यार्थीलातूरचा आहे.
शिकवणी संस्थांमध्ये घेण्यात येणाऱ्या नियमित चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या तणावातून या आत्महत्या झाल्याचे बाेलले जात आहे. लातूरच्या आविष्कार संभाजी कासले याने काेचिंग क्लास इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. कासले याच्या मृत्यूनंतर चार तासांनी नीटची तयारी करत असलेल्या आदर्श राज (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोट्याचे जिल्हाधिकारी ओ. पी. बनकर यांनी शिकवणी संस्थांना पुढील दोन महिने आयआयटी, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांपूर्वीच्या नियमित चाचण्या न घेण्यास सांगितले आहे.