काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 19:31 IST2021-12-25T19:21:11+5:302021-12-25T19:31:25+5:30
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा साठा आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला.

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान
काश्मीर : जम्मू काश्मीरच्या अवंतिपोरा विभागातील त्राल सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शनिवारी चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार या दोन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आल्या.
त्राल सेक्टरच्या हारदुमीर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्या चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अद्यापही चकमक आणि शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. त्राल भागात ठार झालेले दहशतवादी या लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं. या दोन दहशतावाद्यांची नावे नदीम भट आणि रसूल आदिल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्फोट घडवून आणण्याच्या कामासाठी त्यांना संघटनेत दाखल करून घेतले होते. या पूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि ग्रेनेडच्या स्फोटात यांचा सहभाग असल्याचेही विजय कुमार यांनी सांगितलं.
Terrorists neutralized are identified as Nadeem Bhat & Rasool Adil, an IED expert, affiliated with proscribed terror outfit AuGH. 2 AK rifles recovered. Both were involved in several terror incidents including IED blast & grenade throwing: IGP Kashmir
— ANI (@ANI) December 25, 2021
शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जम्मू काश्मीरच्या शोपियान भागातील चौगाम येथेही चकमक झाली होती. त्या चकमकीनंतर थोड्या वेळातच काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांना निष्क्रीय केल्याची माहिती दिली होती.