काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:35 AM2021-07-14T08:35:01+5:302021-07-14T08:35:16+5:30
पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.
श्रीनगर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखल्याचे समजते. त्यातच, आज पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली आहे. त्यामध्ये, दोन दशहतवाद्यांना कंठस्नान देण्यात आलं आहे.
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. मात्र, जवानांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.
Pakistani LeT Commander Aijaz alias Abu Huraira was killed along with 2 local terrorists: IGP Kashmir to ANI
— ANI (@ANI) July 14, 2021
काश्मीर खोऱ्यात सातत्याने दहशतवादी कारवाया सुरु आहेत. पण, भारतीय सैन दलाकडून या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात येते. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.
Two terrorists have been killed in an ongoing encounter between terrorists and security forces in Jammu and Kashmir's #Pulwama district, officials said on Wednesday. pic.twitter.com/rU8AZf3Jx4
— IANS Tweets (@ians_india) July 14, 2021
दरम्यान, स्वातंत्र्य दिनी किंवा त्याच्या आसपास लखनऊसह महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना दोनच दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं. यानंतर आता आयएसआयचा आणखी एक प्लान समोर आला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आल्याची माहिती आहे.
पाकिस्तानातही टीटीपी दहशतावाद्यांचा हल्ला
पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात दोन दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.