२% गावे नाहीत हागणदारीमुक्त महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:56 AM2018-08-06T03:56:04+5:302018-08-06T03:56:07+5:30

मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे.

2% of villages are not included in the hapless Maharashtra 1076 villages | २% गावे नाहीत हागणदारीमुक्त महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश

२% गावे नाहीत हागणदारीमुक्त महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश आहे.
हागणदारीमुक्त होणे बाकी असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमधील गावांची (७१९८) आहे. मध्य प्रदेशातील २०१६ गावांचाही समावेश आहे. देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य सात महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रुरल डेव्हलपमेंट या संस्थेतील प्राध्यापक एच. आर. सोळंकी यांनी सांगितले की, सरकारने बांधून दिलेल्या शौचालयांचा उपयोग केला जातोय का याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ सरकारी दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.

Web Title: 2% of villages are not included in the hapless Maharashtra 1076 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.