2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:38 AM2021-05-31T10:38:55+5:302021-05-31T11:11:23+5:30

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला.

2 Years of Modi 2.0: Did inflation increase or decrease during Modi government ?; Read, what is a referendum by reader of social media | 2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

नवी दिल्ली - देशातील सत्तांतर होऊन 7 वर्षे झाल्यानंतर मोदी सरकारने आपल्या कामकाजाचे लेखाजोखा सोशल मीडियातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून मोदींच्या कार्यकाळात देशाने केलेल्या विकासाची गाणी गायली केली. मोदी सरकारच्या 7 वर्षीय कामाची तुलना काँग्रेसच्या 70 वर्षांसोबतही करण्यात आली. विशेष म्हणजे मोदी सरकार 2 मध्ये देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच, कोरोना महामारीने जनता त्रस्त झाली. तरीही, भाजपा नेत्यांनी विकासाचे गोडवेच गायले. याबाबत लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकार 2 काळातील कार्यासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे.

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून 2019 मध्ये सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून आजतागायत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी पैशांची जमावजमव केली जात असतानाच, दुसरीकडे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने देशाचं अर्थकारण बिघडलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्य दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला आहे. यासंदर्भातच लोकमत डॉट कॉमने मोदी सरकार 2 - कार्यकाळ अन् सर्वसामान्यांचे जीवन, यास अनुसरुन लोकमताच कौल घेतला आहे. 

लोकमतने आपल्या पोलमध्ये महागाई आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांनी मोठ्या प्रमाणात आपली मते नोंदवली. त्यावरुन, मोदी सरकार 2 च्या कामकाजावर जनता खुश नसल्याचेच दिसून येत आहे. 

होय, मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महागाई वाढली की घटली? असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. त्यावर, मोठ्या प्रमाणात वाचकांनी सहभाग घेऊन आपलं स्पष्ट मत मांडल. त्यानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई वाढल्याचे मत 68.45 टक्के वाचकांनी मांडले आहे. महागाई घटल्याचे 13.45 टक्के वाचकांना वाटते. तर, महागाई जैसे थेच असल्याचे 18.08 टक्के वाचकांनी म्हटले आहे. त्यामुळे, एकंदरीचा जनताचा कौल मोदी सरकारच्या विरोधात असून जवळपास 69 टक्के वाचकांनी महागाईत वाढ झाल्याचे रोखठोक मत मांडले आहे. 

होय, मोदी सरकारच्य काळात अर्थव्यवस्था मंदावली...

लोकमतच्या सर्वेक्षणात दुसरा प्रश्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात होता. मोदी सरकार 2 च्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याही प्रश्नावरील सर्वेक्षण वाचकांना चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार, 57.68 टक्के वाचकांनी मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं मत नोंदलं आहे. 33.49 टक्के लोकांना वाटते, अर्थव्यवस्था सुधारली आहे. तर, 8.84 टक्के लोक या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे, मोदी सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं जनमत स्पष्ट दिसून आहे.

लोकमतच्या सर्वेक्षणातून वाचकांनी मोदी सरकार 2 च्या कामगिरीवर नाराजी दर्शवली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि महागाई या परस्परपूरक बाबी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे, वाचकांना सजग नागरिक असल्याचं दाखवत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे, मोदी सरकारला पुढील 3 वर्षात महागाई कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची वाटचाल सुधारणेसाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, तेच मोदी सराकरपुढे आव्हान असणार आहे. 

Web Title: 2 Years of Modi 2.0: Did inflation increase or decrease during Modi government ?; Read, what is a referendum by reader of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.