सौर, पवन ऊर्जा क्षेत्रात होणार २0 अब्ज डॉलरची गुंतवणूक
By admin | Published: February 5, 2016 03:22 AM2016-02-05T03:22:25+5:302016-02-05T03:22:25+5:30
भारतात सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रात २0१८-१९ पर्यंत २0 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे, असे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था अक्षय ऊर्जा विकास एजन्सीने (इरेडा) म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतात सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रात २0१८-१९ पर्यंत २0 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे, असे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था अक्षय ऊर्जा विकास एजन्सीने (इरेडा) म्हटले आहे.
इरेडाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक के.एस. पोपली यांचा हवाला देऊन पीएचडी चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, २0१६-१७ पासून भारतातील सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक येण्यास सुरुवात होईल.
त्या पुढील तीन वर्षांत म्हणजेच २0१९ पर्यंत २0 अब्ज डॉलरची गुंतवणूक या क्षेत्रात होऊ शकते. २0१९ पर्यंत दरवर्षी १0 हजार ते १२ हजार मेगावॅट वीज निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एवढी गुंतवणूक लागणार आहे.