BREAKING: पंजाबमध्ये कोरोनाचा कहर! शाळा सुरू होताच लुधियानामध्ये २० विद्यार्थ्यांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:19 PM2021-08-10T18:19:06+5:302021-08-10T18:20:15+5:30
Punjab Corona in Children: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे.
Punjab Corona in Children: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे. पंजाबमध्ये तर आता कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. लुधियानामधील २ शाळांमध्ये एकून २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय अंगलट येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (20 children in 2 schools of Ludhiana found to be positive for COVID19 says Deputy Commissioner VK Sharma)
20 children in 2 schools of Ludhiana, found to be positive for #COVID19: Deputy Commissioner VK Sharma#Punjab
— ANI (@ANI) August 10, 2021
लुधियानाच्या सरकारी सिनिअर सेकंडरी स्कूल बस्ती जोधेवाल शाळेतील आठ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे विद्यार्थी इयत्ता ११ वी आणि १२ वीचे आहेत. यानंतर संबंधित महाविद्यालय आणि शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करुन घेतलं आहे.