तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:21 PM2023-07-27T16:21:58+5:302023-07-27T16:22:26+5:30
छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले.
बिहारमध्ये एका अभियंत्याच्या घरात मोठं घबाड सापडलं आहे. एका विशेष पथकाने बुधवारी बिहार ब्रिज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले. यानंतर छापेमारी सुरू केली असता, अभियंत्याने घरात मोठे घबाड दडवून ठेवल्याचे समोर आले.
या पथकाला अभियंत्याच्या घरात 97 लाख 80 हजार रुपांची कॅश सापडली. या नोटा ट्रॉली बॅगमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याच बरोबर अभियंता साहेबांची तीन राज्यांतील 20 प्लाटची कागदपत्रेही आढळून आली. याशिवाय विमा गुंतवणुकीसह इतर गुंतवणुकीची कागदपत्रेही आढळून आली. या सर्वांची व्हॅल्यू एक कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकोण सत्तर रुपये असल्यचे सांगण्यात येत आहे. तसेच प्लॉट्स बिहारच्या वेगवेगळ्या शहरांसह झारखंडच्या देवघर आणि उत्तराखंडची राजधारी असलेल्या देहरादूनमध्येही आहेत. या अभियंत्याने 10 पॉलिसीजमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 18 बँकांचे पासबुक आहेत.
सोन्या-चांदीचे दागीने -
याशिवाय, इंजिनिअरच्या घरातून सव्वा किलोहून अधिक सोनं आणइ तीन किलोहून अधिक चांदीही जप्त करण्यात आली आहे. सोन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं 580 ग्रॅम (किंमत जवळपास साडे 34 लाख रुपये) तसेच, 18 कॅरेटच्या सोन्याचे दागिने 700 ग्रॅमहून अधिक (किंमत जवळपास 32 लाख रुपेय). तसेच, 3.230 किलो चांदी, हिची किंमत जवळपास 13 लाख रुपये एवढी आहे.
महत्वचे म्हणजे, अभियंता श्रीकांत शर्मा यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी 24 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 26 जुलै रोजी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.