२०... कळमेश्वर... स्फोट

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:05+5:302015-02-21T00:50:05+5:30

विहिरीतील स्फोटात एक ठार

20 ... karmeshwar ... explosion | २०... कळमेश्वर... स्फोट

२०... कळमेश्वर... स्फोट

Next
हिरीतील स्फोटात एक ठार
दोघे गंभीर जखमी : सावंगी शिवारातील घटना
कळमेश्वर : विहीर खोदताना करण्यात आलेल्या डायनामाईटच्या स्फोटात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी शिवारात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रतापसिंह मानसिंह परती (४०, रा. गजराडा, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव असून, कम्मूसिंह फुलसिंह धुर्वे व परसू टीकाराम धुर्वे दोघेही रा. गजराडा, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. शैलेश मंडलिक रा. नागपूर, यांची सावंगी शिवारात शेती असून, त्यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. सदर तिन्ही कामगार इतर कामगारांसोबत तिथे विहीर खोदण्याचे काम करीत होते. विहिरीला दगड लागल्याने त्यांनी बुधवारी विहिरीत २७ छिद्र तयार करून त्यात डायनामाईटच्या कांड्या टाकून त्यांचा स्फोट केला.
गुरुवारी दुपारी या विहिरीतील खडक व दगड काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी हे तिन्ही कामगार विहिरीत उतरले होते. दगडांचा ढिगारा उपसत असताना अचानक एका डायनामाईटच्या कांडीचा स्फोट झाला. त्यात प्रतापसिंहचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल हेमंत ठाकरे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 20 ... karmeshwar ... explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.