२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 05:32 AM2022-11-27T05:32:59+5:302022-11-27T05:33:27+5:30

समान नागरी कायदाही, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

20 lakh maids, free electric scooters; BJP manifesto published for gujrat | २० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Next

गांधीनगर : पुढील पाच वर्षांमध्ये २० लाख नाेकऱ्या, विद्यार्थिनींना माेफत इलेक्ट्रिक स्कूटर, आदी आश्वासने भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या जनतेला दिली आहेत. भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात युनिफाॅर्म सिव्हील काेड, सरकारी शाळांचे अद्यावतीकरण, आदी आश्वासने देण्यात आली आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधीनगर येथे जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात ३ सिव्हिल मेडिसिटी, २ एम्ससारखी वैद्यकीय संस्थाने उभारण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. असामाजिक तत्त्वांपासून नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी कायदा आणण्याचाही उल्लेख भाजपच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

भाजपचे गुजरात ऑलिम्पिक मिशन 
२०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयाेजनाच्या दृष्टिकाेनातून गुजरात सज्ज करण्यात येणार आहे. त्यासाठी गुजरात ऑलिम्पिक मिशन सुरू करण्यात येणार असून, राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येतील.

भाजपची प्रमुख आश्वासने
nज्येष्ठ महिला नागरिकांना माेफत बस प्रवास
nयुनिफाॅर्म सिव्हिल काेड लागू करणार
nमजुरांना श्रमिक क्रेडिट कार्डद्वारे दोन लाखांपर्यंत माेफत कर्ज
n२० लाख सरकारी नाेकऱ्या महिलांना एक लाख सरकारी नाेकऱ्या
nदेवभूमी द्वारका काॅरिडाॅर निर्माण
nकेजी ते पीजीपर्यंत सर्व मुलींना माेफत शिक्षण
nगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देणार
nसिंचनाच्या सुविधांचे अपग्रेडेशन करणार
nअनुसूचित जमातींसाठी ८ वैद्यकीय महाविद्यालये आणि १० नर्सिंग तसेच पॅरामेडिकल महाविद्यालये सुरू करणार

 

Web Title: 20 lakh maids, free electric scooters; BJP manifesto published for gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.