२०... मौदा... टोल
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:53+5:302015-02-21T00:49:53+5:30
(फोटो)
Next
(फ ोटो)माथनी टोल नाक्यावर शिवसेनेचे आंदोलनमूूलभूत सुविधांची निर्मिती करा : नागपूर ग्रामीण पासिंग वाहने टोल फ्री करण्याची मागणीमौदा : नागपूर ग्रामीण पासिंगची (एमएच-४०) सर्व वाहने टोलमुुक्त करण्यात यावी तसेच या नाक्यावर रामटेकनजीकच्या नाक्याप्रमाणे विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसनेनेच्यावतीने नागपूर - भंडारा महामार्गावरील मौदा नजीकच्या माथनी येथील टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.खा. कृपाल तुमाने, माजी आ. आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले व देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात शिवसैनिक माथनी शिवारातील टोल नाक्याजवळ पोहोचले. त्यांनी विविध घोषणा देत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. काहींनी नाक्यातील गेट अडवून धरले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावण्याची आग्रही भूमिका घेतली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वैनगंगा एक्स्प्रेस वे प्रा. लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी आंदोलनस्थळी आणले. या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यावर सदर अधिकारी मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या नाक्यावर नागपूर ग्रामीण पासिंगची सर्व वाहने टोलमुक्त करण्यात आल्याची घोषणा कृपाल तुमाने यांनी केली. सदर आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. या आंदोलनात पांडुरंग बुराडे, वर्धराज पिल्ले, बबलू चिकटे, तापेश्वर वैद्य, अशोक झिंगरे, राधेश्याम हटवार, नरेश धोपटे, मनोज कोठे, वासू भोयर, रंजना धनजोडे, भगवान बावनकुळे, दिगांबर बांगळकर, नितेश वांगे, शिवा मोथरकर, धनराज चाफले, नरेंद्र भोयर, निंबार्ते, हरिदास मारबते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, मौदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका/प्रतिनिधी)***