शिवसेनेचे २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण
By admin | Published: June 19, 2016 12:17 AM2016-06-19T00:17:45+5:302016-06-19T00:17:45+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार्या शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. शिवसेना सत्तेत असली तरी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही विरोधकाची भूमिका वेळोवेळी बजावत असतो. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यासाठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. दुष्काळामुळे बळीराज होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रदर्शनातून आलेले सहा कोटी रुपयांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना दिली. मराठवाड्यात १ हजार मुलींचे लग्न शिवसेनेने लावून दिले. हा शिवसेनेच्या समाजकारणाचा भाग आहे.
Next
छ ्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार्या शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. शिवसेना सत्तेत असली तरी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही विरोधकाची भूमिका वेळोवेळी बजावत असतो. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यासाठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. दुष्काळामुळे बळीराज होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रदर्शनातून आलेले सहा कोटी रुपयांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना दिली. मराठवाड्यात १ हजार मुलींचे लग्न शिवसेनेने लावून दिले. हा शिवसेनेच्या समाजकारणाचा भाग आहे.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार, चोपडा