जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:51 AM2020-01-06T00:51:04+5:302020-01-06T00:58:57+5:30
राजधानीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात काल संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली.
नवी दिल्ली: राजधानीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात काल संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठ प्रशासनाने हा सर्व प्रकार पोलिसांना कळवला असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हाणामारीत जवळपास 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या धुमश्चक्रीत विद्यार्थी आणि शिक्षकांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे.
जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रियंका गांधींनीही जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली असून, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Delhi: Students continue to protest outside JNU campus against the violence in Jawaharlal Nehru University earlier today. pic.twitter.com/UOxJdS1LKf
— ANI (@ANI) January 5, 2020
तसेच या हाणामारीचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले आहेत. या मारहाणीत सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19 विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हिंसाचाराचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, अभिनेत्री स्वरा भास्कर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.Delhi: Protesters gather outside Police Headquarters against the violence in Jawaharlal Nehru University earlier today. pic.twitter.com/VW1baLvgdH
— ANI (@ANI) January 5, 2020
तर हिंसाचार आणि अराजकता माजवणारी कृत्ये खपवून घेतली जाणार नसल्याचंही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे.
Jawaharlal Nehru University: It is unfortunate that violence took place in JNU campus this evening.The administration strongly condemns any form of violence in the campus.The JNU administration feels great pain&anguish for the students who have sustained injuries in the violence.
— ANI (@ANI) January 5, 2020