गर्लफ्रेंडची 20, तर पतीची 40 हजारात मिळतेय गुप्त माहिती... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:11 AM2018-10-16T11:11:19+5:302018-10-16T11:12:07+5:30

गर्लफ्रेंडसोबत एका तरुणाचा फोटो पाहिल्यानंतर बॉयफ्रेंडने तिच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. डिटेक्टिव्ह सेवेचा आधार घेत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफेंडचा फोटो मिळविला.

20 thousand bucks for girlfriends and 40 thousand for spouses spying | गर्लफ्रेंडची 20, तर पतीची 40 हजारात मिळतेय गुप्त माहिती... 

गर्लफ्रेंडची 20, तर पतीची 40 हजारात मिळतेय गुप्त माहिती... 

Next

फरिदाबाद : गर्लफ्रेंडसोबत एका तरुणाचा फोटो पाहिल्यानंतर बॉयफ्रेंडने तिच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. डिटेक्टिव्ह सेवेचा आधार घेत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफेंडचा फोटो मिळविला. यासाठी त्याला डिटेक्टिव्ह संस्थेला 20 हजार रुपये मोजावे लागले. दरम्यान, अशा प्रकारची ही एक घटना नाही. नात्यांमधील निष्ठेची चाचपणी करण्यासाठी अनेक जण डिटेक्टिव्ह संस्थांची मदत घेताना दिसत आहेत. याच डिटेक्टिव्ह संस्थांचा सध्या ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक डिटेक्टिव्ह संस्थांकडून पती, पत्नी, गर्डफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची गुप्तपणे माहिती मिळविली जात आहे. तसेच, या डिटेक्टिव्ह संस्था सुद्धा आपल्या क्लाइंटला खात्रीपूर्वक माहिती पुरविण्यासाठी मोठमोठी पॅकेज घेत आहेत. यामध्ये तीन प्रकार आहेत.  

संशयित व्यक्तीच्यामागे गुप्तहेर... 
ज्या व्यक्तीची गुप्त माहिती घ्यायची आहे, त्या व्यक्तीमागे डिटेक्टिव्ह संस्था पुरुष अथवा महिलेची गुप्तहेर म्हणून नियुक्ती करते. संशयित व्यक्तीचे गुप्तहेरकडून फोटो काढले जातात. या कामासाठी डिटेक्टिव्ह संस्था 2 ते 4 हजार रुपये प्रतिदिन मानधन घेतात.  

स्पाय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून...
मोबाइलमध्ये एक स्पाय सॉफ्टवेअर इंस्टॉलकरुन गुप्त माहिती घेतली जाते. यासाठी डिटेक्टिव्ह संस्थांकडून 30 हजार रुपये घेतले जात आहेत. हे सॉफ्टवेअर मोबाइमध्ये दिसत नाही. मात्र, यामाध्यमातून संशयित व्यक्तीची काय चर्चा होत आहे, यासंबंधीची सर्व माहिती मिळणार असल्याचा दावा डिटेक्टिव्ह संस्थांकडून करण्यात येत आहे.  

कारमध्ये डिव्हाइस बसविले जाते...
डिटेक्टिव्ह संस्थांच्या माहितीनुसार, कार त्यांनी सांगितलेल्या गॅरेजमध्ये आणावी लागणार. याठिकाणी एका तासात कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाइस बसविले जाते. त्यामुळे कारचे लोकेशन आणि कारमध्ये होणारी बातचीत ऐकू येऊ शकते. या सिस्टिमसाठी डिटेक्टिव्ह संस्था 20 ते 25 हजार रुपये घेतात.  

दरम्यान, पोलीस प्रवक्ता सुबे सिंह यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांच्या गुप्तहेर प्रकरणी तक्रारी येत आहेत. यावर सल्लामसलत करण्यात येत आहे. पोलिसांची पहिला प्रयत्न असा असतो की, यामुळे कोणतेही नाते तुटू नये. मात्र, यानंतरही काहीजण तक्रार दाखल करतात. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

Web Title: 20 thousand bucks for girlfriends and 40 thousand for spouses spying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.