प्राणिसंग्रहालयात दरवर्षी दगावतात २० वाघ

By admin | Published: June 12, 2017 12:04 AM2017-06-12T00:04:55+5:302017-06-12T00:04:55+5:30

भारतातील प्राणिसंग्रहालयात २० वाघ दरवर्षी दगावतात, असा धक्कादायक दावा भारतीय प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव पशुचिकित्सक संघटनेने (एआयझेडडब्ल्यूव्ही) केला आहे.

20 tigers have died every year in zoos | प्राणिसंग्रहालयात दरवर्षी दगावतात २० वाघ

प्राणिसंग्रहालयात दरवर्षी दगावतात २० वाघ

Next

बरेली : भारतातील प्राणिसंग्रहालयात २० वाघ दरवर्षी दगावतात, असा धक्कादायक दावा भारतीय प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव पशुचिकित्सक संघटनेने (एआयझेडडब्ल्यूव्ही) केला आहे. देशभरात मोठे, मध्यम आणि छोटी अशा ६० प्राणिसंग्रहालयांत वाघ जातात. तथापि, प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघांची व अन्य जंगली प्राण्यांची आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली जात नाही.
प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या मृत्यूमागचे कारण नेमके काय? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. तथापि, त्यामागची कारणमीमांसा केली जात आहे, असे एआयझेडडब्ल्यूव्हीचे अध्यक्ष बी. एम. अरोरा यांनी सांगितले. तथापि, केनाईन डिस्टेम्पर व्हायरससह नवीन रोगांमुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांचा मृत्यू होत असल्याचे दिसते. वाघांचे आयुष्य २३ वर्षे असते. वाघांचे ४५ टक्के बछडे पहिल्या वर्षीच दगावतात. यातून सुदैवाने वाचल्यास १९ वर्षे जगतात. तथापि, १९ व्या वर्षी वाघ दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. नवी दिल्लीतील प्राणिसंग्रहालयातील
८ पांढरे वाघ आणि १० पांढऱ्या वाघिणी तीन वर्षांहून अधिक वर्षे जगल्या. अभ्यासानुसार या ठिकाणी असलेल्या वाघांचे सरासरी आयुष्य १२.४६ वर्षे आहे.

Web Title: 20 tigers have died every year in zoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.