20 वेळा घरातून पळणारी मुलगी झाली सज्ञान , पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
By admin | Published: September 27, 2016 02:23 PM2016-09-27T14:23:04+5:302016-09-27T14:28:38+5:30
मणिनगर पोलिसांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कारण गेल्या 6 महिन्यात तब्बल 20 वेळेस घरातून पळून जाणारी मुलगी आता बालिक झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि.27 - गुजरातच्या मणिनगर पोलिसांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कारण गेल्या 6 महिन्यात तब्बल 20 वेळेस घरातून पळून जाणारी मुलगी आता सज्ञान झाली आहे.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वी त्या मुलीने स्वतः पोलिसांना येऊन याबाबत माहिती दिली. मी आता वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यामुळे माझे निर्णय घेण्यास मी आता सक्षम आहे, माझ्या आयुष्यात इतरांनी ढवळाढवळ करू नये असं तिने पोलिसांना सांगितलं.
6 महिन्यांपूर्वी पहिल्यांदा ही मुलगी तिच्याच परिसरातील एका मुलासोबत पळून गेली होती, त्यावेळी ती अल्पवयिन होती . मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे ती पळून गेल्याची तक्रार केली, मात्र कोर्टाच्या चक्कर माराव्या लागू नये यासाठी एफआयआर केली नाही. तीन दिवसांनंतर पोलिसांनी तिला शोधलं असता मी स्वतःच्या मर्जीने घर सोडल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं.
त्यानंतर केवळ 15 दिवसात ती परत पळून गेली. त्यानंतर 6 महिन्यात तब्बल 20 वेळेस ती घरातून पळून गेली. वारंवार ही घटना होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. आता ती मुलगी 18 वर्षांची झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.