20 वर्षांचा पुतण्या, 40 वर्षांची काकू...; काकानं दोघांना रंगेहात पकडलं, लावून दिलं लग्न अ्न मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:53 PM2023-07-24T12:53:36+5:302023-07-24T12:54:23+5:30
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.
बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक विचित्र लव्ह स्टोरी समोर आली आहे. येथे एक 40 वर्षीय काकू आपल्या 20 वर्षीय पुतण्याच्या प्रेमात पडल्या. दोघांचे प्रेम प्रकरण एवढे वाढले की, समाजाची चिंता न करता ते एकमेकांचे झाले. जेव्हा महिलेच्या पतीला हा संपूर्ण प्रकार समजला, तेव्हा त्याने सर्व गावकऱ्यांसमोर या दोघांचे लग्न लावून दिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.
हा संपूर्ण प्रकार जमुई जिल्ह्यातील लक्खापूर गावातील आहे. येथील इंद्रदेव पासवान यांची पत्नी रुबी देवीचे (वय ४० वर्षे) तिचा २० वर्षांचा पुतण्या पंकज पासवान सोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही लपून भेटायचे. रुबीच्या पतीला याची भनकही नव्हती.
"...अन् दोघांनाही रंगेहाथ पकड" -
रुबी म्हणाली, दोघांनीही एकमेकांना स्वीकारले आहे, दोघांचेही एक मेकांवर प्रेम आहे. त्यांनी समाजासमोरही एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले. यासंदर्भात बोलताना, रुबी देवीचा पती इंद्रदेव पासवान म्हणाला, माझ्या पत्नीचे कुठेतरी अफेअर असल्याचा मला संशय होताच, मात्र मी तिला कधीही रंगेहाथ पकडले नव्हते. गेल्या शनिवारी सायंकाळी उशिरा रुबी पंकजकडे गेली होती. याच वेळी, मीही तेथे गेलो आणि दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांचे लग्न लावून दिले.
लग्नानंतर दोघंही काय म्हणाले? -
पंकज म्हणाला, काकूसोबत लग्न करण्याचा निर्णय मजबुरीत घेतलेला निर्णय होता. मी त्यांना पूर्वीही काकूच मानायचो आणि आजही त्या माझ्या काकूच आहेत. या बरोबर आपल्या या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही त्याने म्हटले आहे. याच वेळी रुबी म्हणाली, पंकज माझ्यासोबत नेहमीच लग्नासंदर्भात बोलत होता. मी त्याच्याशी लग्न केले नाही, तर आत्महत्या करेन, असेही तो म्हणाला होता. यानंतर मी त्याला भेटत होते. आता पंकज मला जसे ठेवेल, तसे मी त्याच्यासोबत रहायला तयार आहे.