आईला कावडीत घेऊन २० वर्षे अखंड तीर्थयात्रा!

By admin | Published: April 21, 2016 03:26 AM2016-04-21T03:26:27+5:302016-04-21T03:26:27+5:30

भगवान श्रीकृष्णाच्या येथील बांके बिहारी मंदिराबाहेर दर्शनासाठी लागलेल्या रांगेत सर्वांच्याच नजरा कुतूहलाने त्याच्याकडे वळत होत्या. ते साहजिक होते, कारण ९२ वर्षांच्या अंध आईला

20 years of pilgrimage unmarried mother took a cavalcade! | आईला कावडीत घेऊन २० वर्षे अखंड तीर्थयात्रा!

आईला कावडीत घेऊन २० वर्षे अखंड तीर्थयात्रा!

Next

मथुरा : भगवान श्रीकृष्णाच्या येथील बांके बिहारी मंदिराबाहेर दर्शनासाठी लागलेल्या रांगेत सर्वांच्याच नजरा कुतूहलाने त्याच्याकडे वळत होत्या. ते साहजिक होते, कारण ९२ वर्षांच्या अंध आईला कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन आलेला तो आधुनिक श्रावणबाळ होता!
बघता बघता त्याच्याभोवती घोळका जमला. कोण? कुठला? याची चौकशी सुरु झाली आणि आईची इच्छा तळहातावर झेलत गेली २० वर्षे अखंड तीर्थयात्रा करणाऱ्या या अवलियाची मुलखावेगळी कहाणी समोर आली.
त्याचे नाव कैलाश गिरी. वय ४८ वर्षे. त्याच्या आईचे नाव कीर्तीदेवी. दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे. कैलाशने आईला बसविलेली टोपली खांदावर वागवत आत्तापर्यंत सुमारे ३७ हजार किमीची तीर्थयात्रा पायी केली आहे. काशी, अयोध्या, चित्रकूट, रामेश्वरम. तिरुपती, पुरी, जनकपूर (नेपाळ), केदारनाथ, हृषिकेश, हरिद्वार, व्दारका, महाबळेवर यासह इतरही असंख्य तीर्थस्थळांची वारी करून ही मायलेकाची जोडी शेवटच्या टप्प्यात आता मथुरेत आली आह. आईचे, डोळ््यांनी नाही तरी निस्सिम श्रद्धने मनोभावे, गोपाळकृष्णाचे दर्शन झाले की कैलाश जन्मदात्रीच्या ऋणातून उतराई होईल. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन दोघांचा घरी जाण्याचा परतीचा प्रवास सुरु होईल.
याची सुरुवात कशी झाली असे विचारता कैलाश सांगू लागला... नक्की दिवस आठवत नाही, पण १९९६ हे साल पक्के आठवते. आईने पायी चारधाम यात्रा करण्याचा हट्ट धरला. आई तेव्हा सत्तरीला आली होती व डोळ््यांनी दिसतही नव्हते. ती एकटी कशी तीर्थयात्रा करणार, असा विचार आला आणि तिला खांद्यावर घेऊन मीच यात्रेला नेण्याचे मनात पक्के केले. सुरुवात केली तेव्हा मी ३८ वर्षांचा होतो. आता पन्नाशीला आलो. झालं, आता आणखी थोडे दिवस आईची कावड वाहिली की तिची इच्छा पूर्ण होईल व माझे मनोरथही...
कैलाशला श्रावणबाळाची उपमा दिलेली आवडत नाही. संपूर्ण आयुष्य यात गेले. इतरांना पडतो तसा कधी अन्य गोष्टींचा मोह पडला नाही? यावर कैलाशने दिलेले उत्तर मातृऋणाची परमोच्च जाण ठेवणारे आहेत. तो सांगतो.. आईने मला केवळ जन्मच नव्हे तर पुनर्जन्मही दिला आहे. १४ वर्षांचा असताना उंच झाडावरून खाली पडलो. त्यावेळी खरे तर मी मरायचोच. पण आईने केलेली सुश्रुषा व अहोरात्र केलेली प्रार्थना यामुळेच वाचलो. त्यामुळे त्यानंतरच्या माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझा नाही तर सर्वस्वी तिचाच आहे. या एकाच विचाराने गेली २० वर्षे सतत बळ मिळत गेले. कैलाश म्हणतो, मी हे जे काही करीत आहे त्यात माझा जराही मोठेपणा नाही. ते माझे कर्तव्यच होते. मी १० वर्षांचा असताना वडिल वारले. भाऊ-बहिणही पाठोपाठ जग सोडून गेले. त्यामुळे आईसाठी एवढे करणे मला भागच होते! (वृत्तसंस्था)


कैलाशचा उद्देश तीर्थयात्रेचा असला तरी मथुरेत येण्याआधी आग्रयात त्याने काहीचा अपवाद केला. आवर्जून ताजमहाल पाहिला. अर्थात तेही प्रेमाचे मंदिरच आहे.

Web Title: 20 years of pilgrimage unmarried mother took a cavalcade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.