काश्मीरमध्ये भाजपाच्या २०० कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:27 AM2017-08-16T04:27:11+5:302017-08-16T04:27:14+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
श्रीनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोºयातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री अटक झाली. तर अबी गुलजार यांच्यासह काही जणांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.
>हा तर नियोजित प्लॅन
स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीरमध्ये मंगळवारी भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उद्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध गटांचे नेते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपाचे प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघात ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’चा जयघोषही करणार आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करणे, हे सरकारचा नियोजित प्लॅन होता.