काल मजुराच्या खात्यावर २०० कोटी जमा झाले, आज कुटुंबीय भीतीच्या छायेत; पोलिसांकडे केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:02 PM2023-09-07T17:02:22+5:302023-09-07T17:04:03+5:30

चरखी-दादरी येथील आठवी पास मजूर असलेल्या विक्रमला त्याच्या बँक खात्यात २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे कळताच त्याला धक्का बसला.

200 crores deposited in laborer's account yesterday, today families are in fear; 'This' demand was made to the police | काल मजुराच्या खात्यावर २०० कोटी जमा झाले, आज कुटुंबीय भीतीच्या छायेत; पोलिसांकडे केली 'ही' मागणी

काल मजुराच्या खात्यावर २०० कोटी जमा झाले, आज कुटुंबीय भीतीच्या छायेत; पोलिसांकडे केली 'ही' मागणी

googlenewsNext

काल हरियाणा येथील एका मजुराच्या मोबाईलवर अचानक २०० कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. हा मेसेज वाचल्यानंतर त्याला धक्काच बसला,  एवढी मोठी रक्कम त्याच्या खात्यात कशी आली, याचे कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटले. मात्र, तो हा पैसा खर्च करू शकला नाही. उलट पोलिसांचा ताफा मजुराच्या घरी पोहोचला आणि चौकशी करू लागले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण चरखी-दादरीच्या बेर्ला गावातील आहे, तिथे मजूर विक्रमच्या खात्यात २०० कोटी रुपये जमा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. एकीकडे एवढे पैसे पाहून सर्वांना आनंद होणार असताना दुसरीकडे विक्रमच्या घरात भीतीचे वातावरण आहे.

मंगळावर 50 वर्षांपूर्व सापडला होता एलियन, नासानं चुकून मारला? वैज्ञानिकाचा मोठा दावा!

विक्रमच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी, विक्रमच्या खात्यात इतके पैसे आल्यानंतर त्यांना भीतीच्या छायेत जगणे भाग पडले आहे. त्यांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस संरक्षणाची विनंती केली. 

आता या संदर्भात विक्रमच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केला आहे. केस सोडवण्याऐवजी ते त्यांना धमक्या देत आहेत, त्यात त्यांचा काहीही दोष नाही. दोन दिवसांपूर्वी, यूपी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि विक्रमची चौकशी केली की त्याच्या येस बँक खात्यात २०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

ही २०० कोटी रुपयांची बाब आहे म्हणून एक टीम बँकेत पोहोचेल आणि खात्याची चौकशी करेल. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या बँक खाते गोठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विक्रमच्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी जेवढे व्यवहार झाले, त्या व्यवहारांच्या रकमेतील सर्व अंक फक्त ९ आहेत. 

दोन दिवसांपूर्वी यूपी पोलीस विक्रमच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी विक्रमला विचारले - त्याच्या येस बँक खात्यात २०० कोटींचा व्यवहार झाला आहे, हे पैसे आले कुठून? त्यामुळे पोलिसांचे म्हणणे ऐकून विक्रम आणि त्याचे कुटुंबीय स्तब्ध झाले. दोन महिन्यांपूर्वी विक्रम पतौडी येथे नोकरीसाठी गेला होता. तेथे ते एक्स्प्रेस-20 नावाच्या कंपनीत मजूर म्हणून रुजू झाला. विक्रमचा भाऊ प्रदीपच्या म्हणण्यानुसार, खाते उघडण्यासाठी विक्रमकडून कागदपत्रे घेण्यात आली आणि नंतर त्याचे खाते रद्द केले जाईल असे सांगितल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. विक्रमने जवळपास १७ दिवस तेथे काम केले.

 फसवणूक करण्यासाठी विक्रमच्या कागदपत्रांचा वापर करून बँक खाते उघडण्यात आल्याचा संशय आहे. सध्या तपास सुरू आहे. 

Web Title: 200 crores deposited in laborer's account yesterday, today families are in fear; 'This' demand was made to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.