'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?'

By महेश गलांडे | Published: February 5, 2021 11:20 AM2021-02-05T11:20:28+5:302021-02-05T11:22:04+5:30

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

'200 farmers arrested in agitation, but is Deep Sidhu still at large?', sanjay raut in lok sabha | 'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?'

'आंदोलनातील 200 शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?'

googlenewsNext
ठळक मुद्देसरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केली जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केलीय

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता संसदीय अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील विविध नेते आणि खासदार कृषी कायद्यांवरुन सरकारला लक्ष्य करत आहेत. संसदेत सरकारला प्रश्न विचारत आहेत. खासदार सुप्रिया सुळेंसह 10 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून गाझीपूर सीमारेषेवरील शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. तर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही दीप सिद्धूला अटक कधी करणार ? असा प्रश्न संसदेत विचारला आहे. 

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण २६ जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले असा आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर केला होता. त्यानंतर, संजय राऊत यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, आरोपी अभिनेता दीप सिद्धुला अद्याप अटक का झाली नाही, असा सवालही त्यांनी विचारलाय.  

''ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केली जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केलीय, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.  

दरम्यान, पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखांचं रोख बक्षिस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

लाल चौकात तिरंगा फडकवणारे नरेंद्र मोदीच

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Web Title: '200 farmers arrested in agitation, but is Deep Sidhu still at large?', sanjay raut in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.