पाकिस्तानी बोटीतून २०० किलो हेरॉइन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:48 AM2019-05-22T05:48:07+5:302019-05-22T05:48:18+5:30

पाठलाग होताच पाकिटे फेकली समुद्रात

200 kg of heroin seized from Pakistani boat | पाकिस्तानी बोटीतून २०० किलो हेरॉइन जप्त

पाकिस्तानी बोटीतून २०० किलो हेरॉइन जप्त

Next

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी गुजरातच्या जखाऊ किनाऱ्यापासून दूर आंतरराष्ट्रीय सागरी सीमेनजीक अंमली पदार्थानी भरलेली
‘अल मदिना’ ही पाकिस्तानची मच्छिमार बोट पकडून तिच्यातून संशयास्पद अंमली पदार्थांची १९४ पाकिटे हस्तगत केली. तस्करीसाठी आणलेल्या या अवैध मालाची आंतरराष्ट्रीय बाजारीत किंमत ५०० कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे.


तटरक्षक दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीजवळ अंमली पदार्थ पोहोचविण्यासाठी पाकिस्तानहून आलेली एक मच्छिमार बोट नांगर टाकून वाट पाहात थांबली आहे, अशी गुप्तवार्ता मिळाल्याने किनाºयावरून तटरक्षक दलाचे एक जहाज व दोन वेगवान बोटी रवाना करण्यात आल्या.


तब्बल २०० किलो अमलीपदार्थ
पत्रकानुसार त्या भागातील समुद्र खवळलेला होता तरी तटरक्षक दलाने पाठलाग करून त्या बोटीस अडविले व दलाचे अधिकारी तिच्यावर चढले. ही झटापट सुरु असताना त्या मच्छिमार बोटीवरील लोकांनी बोटीतील संशयास्पद पाकिटे समुद्रात फेकण्यास सुरुवात केली. फेकलेली सात पाकिटे तटरक्षक दलाने समुद्रातून बाहेर काढली. मच्छिमार बोटीवरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना बोटीसह किनाºयावर आणण्यात आले. बोटीतील संशयास्पद पाकिटांमधील पदार्थाची तापसणी केली असता ते हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे वजन सुमारे २०० किलो आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: 200 kg of heroin seized from Pakistani boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.