रेल्वे बनवणार ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे कोच

By admin | Published: February 8, 2015 11:57 PM2015-02-08T23:57:16+5:302015-02-09T00:35:44+5:30

ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे रेल्वे कोच बनविण्याची तयारी रेल्वेने चालवली आहे़ चेन्नई येथील आपल्या कारखान्यात रेल्वेने या दिशेने काम सुरू केले

200 km to make the railway Fast running coach | रेल्वे बनवणार ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे कोच

रेल्वे बनवणार ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे कोच

Next

राजीव मुळ्ये-बेळगावात मराठी नाट्य संमेलन आयोजित करीत असताना कर्नाटकाच्या पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी ही घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ शब्द का गिळला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सूप रविवारी सायंकाळी वाजले. समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रावते यांनी अपेक्षेप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. मराठी माणसाचा हुंकार थांबविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला असून, मराठी माणूस कधीच झुकणार नाही. एका राज्याच्या मंत्र्याला दुसऱ्या राज्यात दौरा करताना त्या राज्याकडून मिळणाऱ्या सेवा या दौऱ्यात आपण नाकारल्या आहेत, असे रावते यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
संमेलन नगरीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘कलावंतांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना संमेलनाच्या उद्घाटनावेळी आठवले; परंतु गेली १५ वर्षे त्यांची
सत्ता होती तेव्हा त्यांनी काय केले? स्व:त:चे पाकीट शाबूत ठेवून दुसऱ्याच्या खिशात
हात घालण्याची सवय असली की असेच
होते’’, असा टोलाही त्यांनी लगावला.
सात दिवसांत सात नाटकांचा महोत्सव करण्याची परंपरा ग्रामीण भागात पोहोचविता येईल का, याचा रंगकर्मींनी विचार करावा, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही रावते यांनी
दिले. भाषणाच्या शेवटी हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना दोन मिनिटे उभे राहण्याची विनंती त्यांनी केली. तसेच अखंड, संपूर्ण जय महाराष्ट्र, असा घोष करून भाषणाची सांगता
केली.

कारवाईच्या भीतीने उद्धवची दांडी?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून काही बोलाल तर कारवाई करु, असा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेळगावला जाण्याचे टाळले, अशी चर्चा शिवसेनेच्याच वर्तुळात सुरु आहे. / वृत्त ५


‘जय महाराष्ट्र’ का वगळले : पवार यांच्या भाषणाचा ‘बाईट’ माझ्याकडे असून, भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ म्हटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ जाणीवपूर्वक का वगळले, असा सवाल त्यांनी केला. त्याचसोबत ‘जय कर्नाटक’ म्हटले तरी चालले असते, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: 200 km to make the railway Fast running coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.