२.५० लाखापेक्षा जास्त डिपॉझिटवर टॅक्स आणि बेहिशोबी आढळल्यास २०० टक्के दंड

By Admin | Published: November 10, 2016 12:46 PM2016-11-10T12:46:17+5:302016-11-10T11:26:53+5:30

यापुढे अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत डिपॉझिट केल्यास त्यावर कर भरावा लागू शकतो तसेच खातेदारांच्या उत्पन्नाशी या रक्कमेचा मेळ बसत...

200% penalty if tax and liability is found on deposits of more than 2.50 lakh | २.५० लाखापेक्षा जास्त डिपॉझिटवर टॅक्स आणि बेहिशोबी आढळल्यास २०० टक्के दंड

२.५० लाखापेक्षा जास्त डिपॉझिटवर टॅक्स आणि बेहिशोबी आढळल्यास २०० टक्के दंड

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर यापुढे अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत डिपॉझिट केल्यास त्यावर कर भरावा लागू शकतो तसेच खातेदारांच्या उत्पन्नाशी या रक्कमेचा मेळ बसत नसेल म्हणजेच जमा केलेली रक्कम बेहिशोबी आढळली तर त्यावर २०० टक्के दंड आकारला जाईल असे वृत्त एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिले आहे. 
 
३० डिसेंबरपर्यंत या ५० दिवसात जे लोक मोठया रक्कमा जमा करतील त्यांचे पॅनकार्ड नंबर आणि माहिती ठेवण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्वेलर्सनाही दागिने विकत घेणा-यांचे पॅनकार्ड नंबर आणि माहिती ठेवण्यास सांगण्यात आली आहे. जे या निर्देशांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

Web Title: 200% penalty if tax and liability is found on deposits of more than 2.50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.