कर्नाटकात २०० युनिट वीज मोफत, गृहलक्ष्मीला महिना २,००० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:57 PM2023-06-03T13:57:34+5:302023-06-03T13:57:48+5:30

कर्नाटक मंत्रिमंडळाने घेतला निर्णय.

200 units of free electricity in Karnataka Rs 2000 per month to Grilahkshmi cabinet decision | कर्नाटकात २०० युनिट वीज मोफत, गृहलक्ष्मीला महिना २,००० रुपये

कर्नाटकात २०० युनिट वीज मोफत, गृहलक्ष्मीला महिना २,००० रुपये

googlenewsNext

बंगळुरू : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ५ कल्याणकारी योजना जात किंवा धर्म असा भेदभाव न करता याच आर्थिक वर्षात अमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतला, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्न भाग्य, शक्ती व युवा निधी या योजना राबविण्याचे वचन देण्यात आले होते. सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला २००० रुपये मासिक मदत, दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला १० किलो तांदूळ मोफत, बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु. ३००० व बेरोजगार पदविका धारकांसाठी दरमहा १५०० रुपये भत्ता (दोन्ही १८ ते २५ वयोगटातील) तसेच एसटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास या योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 

राजस्थानात १०० यूनिट वीज मोफत 
राजस्थानातही घरगुती वीज वापरकर्त्यांना १०० यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तसेच, २०० यूनिटपर्यंत विजेवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

Web Title: 200 units of free electricity in Karnataka Rs 2000 per month to Grilahkshmi cabinet decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.