प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करणार, गरीबांना LPG कनेक्शनसाठी 2000 कोटींची तरतूद
By admin | Published: February 29, 2016 11:49 AM2016-02-29T11:49:10+5:302016-02-29T11:49:10+5:30
दारीद्र्य रेषेखालील घराघरात एलपीजी सिलिंडर असावा यासाठी सुरुवातीला 2000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे जेटली म्हणाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला आहे. त्यासाठी गरीबातल्या गरीब घरामध्ये एलपीजी कनेक्शन देण्याचा मानस केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उचलला आहे. दारीद्र्य रेषेखालील घराघरात एलपीजी सिलिंडर असावा यासाठी सुरुवातीला 2000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे जेटली म्हणाले.
विशेष म्हणजे, गरीब महिलांच्या नावावर एलपीजी कनेक्शन असायला हवं यासाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण बागाला विशेष प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना जेटली यांनी ग्रामीण भागासाठी बजेटमध्ये एकूण 87,765 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले.