2000 च्या नोटमध्ये जीपीएस चीप ही निव्वळ अफवा- जेटली
By admin | Published: November 9, 2016 05:47 PM2016-11-09T17:47:07+5:302016-11-09T17:47:07+5:30
येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप लावण्यात आली असून त्याद्वारे पैसे कोठे आहेत याचा कधीही शोध घेता येऊ शकतो अशा बातम्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - रोजच्या चलनातून 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर नव्या नोटांबाबत निरनिराळ्या अफवा पसरत होत्या. येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप लावण्यात आली असून त्याद्वारे पैसे कोठे आहेत याचा कधीही शोध घेता येऊ शकतो असे मेसेज आणि बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. मात्र, जीपीएस चीप लावण्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असून अशा निरर्थक बातम्या कशा येतात हे माहित नाही अशा स्पष्ट शब्दात केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आज दुपारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दोन हजाराच्या नोटमध्ये ट्रॅकिंग प्रणाली आहे, ही नोट 120 मीटरपर्यंत जमिनीत ठेवली तरी त्याची माहिती मिळेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, जेटलींच्या या निर्णयामुळे या अफवेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. काळा पैसा आणि विदेशातून येणा-या बनावट नोटांना आळा बसावा यासाठी मोदी सरकारने हा ऐतिहासीक निर्णय घेतला.