सम-विषम क्रमांकाचा नियम मोडणा-यांना दिल्लीत २००० रुपये दंड
By admin | Published: December 24, 2015 11:48 AM2015-12-24T11:48:44+5:302015-12-24T11:48:44+5:30
सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी करणार त्याची माहिती गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
Next
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एकदिवसाआड दिल्लीच्या रस्त्यावर सम आणि विषम क्रमांकाच्या गाडयांना परवानगी देण्याच्या योजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी करणार त्याची माहिती गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
१) सम तारखेला सम क्रमांकाच्या गाडया दिल्लीच्या रस्त्यावर धावतील
२) विषय तारखेला विषम क्रमांकाच्या गाडया रस्त्यावर परवानगी असेल
३) सम आणि विषम क्रमाकांचा नियम मोडणा-या गाडयांना २००० रुपये दंड आकारण्यात येईल
४) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांना सम-विषम क्रमांकांच्या गाड्यांच्या नियमातून वगळण्यात आले आहे.
५) प्रायोगित तत्वावर पहिले १५ दिवस एक जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ही योजना राबवण्यात येईल.
६) सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सम आणि विषम क्रमांक गाडी योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल
७) रविवारी सम आणि विषम दोन्ही क्रमांकाच्या गाडया रस्त्यावर उतरु शकतात.