तब्बल २० हजार शाळा बंद पडल्या, शिक्षकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:28 AM2022-11-29T06:28:33+5:302022-11-29T06:29:18+5:30
२० हजार शाळा बंद पडल्या; विद्यार्थ्यांची संख्याही घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात भारतातील शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. २०२१-२२ या कालावधीत देशभरात २.८० लाख शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर २० हजार शाळा बंद पडल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही घटले. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशनल रिपोर्टमध्ये (यूडीआयएसई) हे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.
बोर्डिंग स्कूलच्या संख्येत वाढ
कोरोनाच्या आधी देशात ३४,९४६ बोर्डिंग स्कूल होत्या. २०२१-२२ या कालावधीत त्यांची संख्या ४५,३६९ वर पोहोचली आहे.
अनेक शाळांना लागले कुलूप
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात देशात १५.०९ लाख शाळा सुरू होत्या. साथीच्या तडाख्यामुळे २० हजार शाळा बंद पडल्या. त्यामुळे १४.८९ लाख शाळा सुरू आहेत.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे कमी प्रमाण
n कोरोना साथीच्या काळात २०२१-२२ यावर्षी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी झाले. प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ११.५ लाखांनी कमी झाली.
n २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात देशात लसीकरण सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.