गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तिघांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:07 PM2018-08-27T15:07:20+5:302018-08-27T15:08:01+5:30

2002 Godhra train burning case: गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. 

2002 Godhra train burning case: Two accused found guilty, three acquitted by special SIT court in Ahmedabad. | गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तिघांची सुटका

गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तिघांची सुटका

Next

अहमदाबाद : गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. 

गोध्रा हत्याकांडप्रकरणी आज एसआयटी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आरोपी इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. तर, हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची सुटका केली आहे. 




2015-16 मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी सहा जणांना गोध्रा हत्याकांडाप्रकरणी अटक केली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सरकारी वकील जे. एम. पांचाल यांच्या माहितीनुसार, सहा आरोपींमधील कादिर पटालियाचे गेल्या जानेवारी महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर बाकीच्या पाच आरोपींवर खटला चालू होता. यामध्ये हुस्सैन सुलेमान मोहन, कासम भमेडी, फारुक धांतिया, फारुक भाना आणि इमरान उर्फ शेरु भटुक यांचा समावेश होता. हे सर्वजण गोध्रा येथील राहणारे आहेत. 

दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनवर कारसेवक असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते. 
 

Web Title: 2002 Godhra train burning case: Two accused found guilty, three acquitted by special SIT court in Ahmedabad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.