जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:02 PM2019-12-20T17:02:31+5:302019-12-20T17:03:28+5:30

१३ मे २००८ रोजी जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ८० जणांचा मृत्यू झाला होता

2008 Jaipur bomb blasts case: All the four convicts to be hanged till death, Jaipur court announces quantum | जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा

जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा

Next

जयपूर -  जयपूरमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जयपूरमधील न्यायालयाने चार दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणी आहे. २००८ मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जयपूरमधील विशेष या प्रकरणी चार आरोपींना दोषी ठरवले होते. तर एका आरोपीची मुक्तता केली होती. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते. 
२००८ मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने आज दोषी आरोपींना शिक्षा सुनावली. यामध्ये सरवर आझमी, मोहम्मह सैफ, सैफुर रहमान आणि सलमान या चार आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 



१३ मे २००८ रोजी जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ८० जणांचा मृत्यू झाला होता. तर १७६ जण जखमी झाले होते. 

Web Title: 2008 Jaipur bomb blasts case: All the four convicts to be hanged till death, Jaipur court announces quantum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.