२०११मध्येही सर्जिकल स्ट्राईक, ३ पाकी जवानांचे शिरच्छेद?
By admin | Published: October 9, 2016 02:43 PM2016-10-09T14:43:19+5:302016-10-09T14:43:19+5:30
भारतीय जवानांना मारल्याचा बदला घेण्यासाठी २०११ मध्ये भारताने LOC पार करुन पाकीस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याची खळबळजनक वृत्त दी हिंदू या वृत्तपत्राने दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ : काही आठवड्यांपूर्वी भारताने केलेल्या पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात असतानाच. भारतीय जवानांना मारल्याचा बदला घेण्यासाठी २०११ मध्ये भारताने LOC(नियंत्रण रेषा) पार करुन पाकीस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याची खळबळजनक वृत्त दी हिंदू या वृत्तपत्राने दिले आहे. जुलै २०११मध्ये पाक सैन्याच्या हल्ल्यात ६ भारतीय जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या सहा जवानांपैकी दोघांचे शीर धडावेगळे करुन पाकिस्तानात नेण्यात आलं होतं. पाकड्यानीं केलेल्या त्याच कारवाईचा बदला भारतीय सैनिकांनी काही दिवसातच पाकव्याप्त काश्मीरच्या जिंजर भागात धडक कारवाई करत घेतला होता.
दी हिंदू या वृत्तपत्राच्या वृत्ताला भारतीय लष्काराकडून अथवा सरकारकडून कोणताही दुजोरा आलेला नाही. दी हिंदूच्या वृत्तानुसार भारतीय जवानांनी त्यावेळी ८ पाक सैनिकांचा खात्मा केला होता. तर ३ पाकी सैनिकांचे शीर धडावेगळं करुम भारताच्या हद्दीत आणले होते. भारतीय सैन्याने ऑपरेशन जिंजर ही मोहीम तयार केली होती. या मोहीमेत लष्कराने पाकिस्तानच्या तीन चौक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. जोर, हिफाझत आणि लष्दत या चौक्यांना सैन्याने लक्ष्य केले होते.
दरम्यान, उरी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत ३८ जणांचा खात्मा केला होता.