२०१२ साली देखील दिल्लीत इस्राईली अधिकाऱ्यांच्या कारमध्ये झाला होता बॉम्बस्फोट
By पूनम अपराज | Published: January 29, 2021 08:39 PM2021-01-29T20:39:42+5:302021-01-29T20:41:09+5:30
Delhi Bomb Blast :दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता.
शुक्रवारी सायंकाळी देशाच्या राजधानी दिल्लीत आयईडी स्फोटाची घटना इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर शुक्रवारी घडली. कमी तीव्रतेच्या स्फोटामुळे काही कारच्या काचा फुटल्या असल्याचे सांगितले जात आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी दिल्लीपोलिसांचे स्पेशल सेल तपास करत आहे. आज भारत आणि इस्रायल देखील त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 29 वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे. २०१२ साली फेब्रुवारी महिन्यात इस्त्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या कारला लक्ष्य करण्यात आले होत आणि बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता. फायर कारनेही जाऊ दिले नाही. औरंगजेब रोडवर बॉम्बचा स्फोट झाला होता, असे अग्निशमन नियंत्रण कक्षाला 6 वाजता फोन आला. हा फोन येताच घटनास्थळावर कॅनॉट प्लेस येथील अग्निशमन केंद्रातून तीन वाहने पाठविली गेली.
An alert has been issued at all airports, important installations and government buildings in view of blast reported in Delhi. Enhanced security measures have been put in place: Central Industrial Security Force pic.twitter.com/hWkTsTdJaX
— ANI (@ANI) January 29, 2021
खळबळ उडवण्यासाठी स्फोट
इस्त्रायली दूतावासापासून सुमारे 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईलचे दूतावास आहे. संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त पीआरओ अनिल मित्तल म्हणाले की, प्राथमिक तपासणीतून असे दिसते की, एखाद्याने खळबळ उडवण्यासाठी हे केले असेल.
काही किमी अंतरावर सुरु होता बीटिंग रिट्रीट सोहळा
दिल्लीतील औरंगजेब मार्गावरील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे दिल्ली पोलिसांत खळबळ उडाली आहे. या परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर बीटिंग रिट्रीट सोहळा चालू असताना स्फोट झाला होता, जिथे अनेक व्हीआयपी उपस्थित असतात.
दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी
Israel is treating a small bomb blast near the Israeli embassy in Delhi today, which did not injure anyone, as a terrorist incident: Reuters quoting an Israeli official
— ANI (@ANI) January 29, 2021