मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 05:48 PM2021-11-01T17:48:27+5:302021-11-01T18:58:23+5:30

बिहारच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 नरेंद्र मोदींच्या रॅलीत साखळी बॉम्बस्फोट झाला होता.

2013 Patna Gandhi Maidan serial blasts | NIA Court Patna | 4 get capital punishment, 2 get life imprisonment, 2 get 10yr imprisonment&1 gets 7yr imprisonment | मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप

googlenewsNext

पाटणा: 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटप्रकरणी (Patna Gandhi Maidan Serial Blast) न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पाटणाच्या NIA कोर्टाने सोमवारी गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींना फाशीची, 2 आरोपींना जन्मठेपेची, 2 आरोपींना 10 वर्षांची आणि एका आरोपीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं.

एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा ​​यांनी इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले. तर फखरुद्दीनला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. या प्रकरणी एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं, त्यापैकी एका आरोपीचे वय कमी असल्याने हा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता.

काय आहे प्रकरण ?
बिहराच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी झालेल्या भाजपच्या हुंकार रॅलीचे प्रमुख वक्ते नरेंद्र मोदी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेद भाजपचे इतर मोठे नेतेही उपस्थित होते. त्यावेळी मैदानात एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोटांची मालिका घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले. हैदर अली आणि मुजिबुल्ला हे गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार होता. एनआयएने आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता इम्तियाजने अनेक नावे सांगितली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. या चौकशीत बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणाबद्दलही मोठी माहिती समोर आली.

Web Title: 2013 Patna Gandhi Maidan serial blasts | NIA Court Patna | 4 get capital punishment, 2 get life imprisonment, 2 get 10yr imprisonment&1 gets 7yr imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.