२०१४ मध्ये धोनीने कसोटी सामना फिक्स केला होता ?
By admin | Published: February 8, 2016 03:34 PM2016-02-08T15:34:50+5:302016-02-08T15:34:50+5:30
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी मॅच फिक्सिंग मध्ये अडकला असल्याचे समोर आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये दिल्ली क्रिकेट संघटनेचे सचिव सुनील देव यांनी धोनीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी मॅच फिक्सिंग मध्ये अडकला असल्याचे समोर आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये दिल्ली क्रिकेट संघटनेचे सचिव सुनील देव यांनी धोनीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. २०१४सालची भारत आणि इंग्लंडमधली मॅन्चेस्टर कसोटी सामना फिक्स होता, असा खळबळजनक दावा तेव्हांचे टीम इंडियाचे मॅनेजर आणि आत्ताचे डीडीसीएचे सेक्रेटरी सुनिल देव यांनी केला आहे. एका हिंदी दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनिल देव यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.
पावसामुळे पिचची अवस्था पाहता टॉस जिंकलो तर बॉलिंग घ्यायचा निर्णय टीम मीटिंगमध्ये झाला होता, पण धोनीनं बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आम्हाला धक्का दिला, असं देव या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हंटले आहेत. धोनीच्या या निर्णयामुळे इंग्लंडचे माजी कॅप्टन जेफ्री बॉयकॉट यांनाही धक्का बसल्याचं देव म्हणाले आहेत. भारताने हा सामना एक डीव आणि ५४ धावांनी गमावला होता.
दरम्यान, २०१४ साली इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टरमध्ये झालेला मानहानीकारक पराभव हा भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं फिक्स केल्याच्या दाव्यावरून दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवानं घुमजाव केलं आहे.
दिल्लीतल्या सन स्टार या वृत्तपत्रानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनील देव यांनी ही मॅच धोनीनं फिक्स केल्याचा दावा केला होता. पण वृत्तपत्रानं हे स्टिंग ऑपरेशन जारी करताच सुनील देव यांनी घुमजाव केलं आहे. इतकंच नाही, तर या वृत्तपत्राला कोर्टात खेचणार असल्याचा दावाही केला आहे.