२०१४ मध्ये एकूण ३८,५६५ बालगुन्हेगारांची नोंद
By Admin | Published: December 22, 2015 05:29 PM2015-12-22T17:29:19+5:302015-12-22T19:18:35+5:30
देशभरात २०१४ मध्ये ३८,५६५ बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती लोकसभेत मंगळवारी देण्यात आली.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशभरात २०१४ मध्ये ३८,५६५ बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती लोकसभेत मंगळवारी देण्यात आली.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०१४ मध्ये देशातील वेगवेगऴ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्हांमध्ये बालगुन्हेगांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये एकूण ३८,५६५ बालगुन्हेगांराची नोंद करण्यात आली असून २०१३ मध्ये ३५,८६१ आणि २०१२ मध्ये ३१,९७३ बालगुन्हेगांची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हरीभाई पारथीभाई चौधरी यांनी लोकसभेत दिली.
देशातील २०१४ मधील ५५ टक्के बालगुन्हेगार हे २५ हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हरीभाई पारथीभाई चौधरी यांनी बालगुन्हेगारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.