2019 नाही तर 2024 मधील निवडणुकीच्या तयारीला लागा - ओमर अब्दुल्ला

By admin | Published: March 11, 2017 12:07 PM2017-03-11T12:07:13+5:302017-03-11T12:12:16+5:30

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर विरोधकांना 2019 नाही तर 2024 च्या निवडणुकीची तयारी करायला सांगितलं आहे

2019, otherwise prepare for elections in 2024 - Omar Abdullah | 2019 नाही तर 2024 मधील निवडणुकीच्या तयारीला लागा - ओमर अब्दुल्ला

2019 नाही तर 2024 मधील निवडणुकीच्या तयारीला लागा - ओमर अब्दुल्ला

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले असून भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरलेली उत्तप्रदेश विधानसभा भाजपाने जिंकली आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे. भाजपाचा हा दणदणीत विजय विरोधकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर विरोधकांना 2019 नाही तर 2024 च्या निवडणुकीची तयारी करायला सांगितलं आहे. 
 
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लादेखील भाजपाचं प्रदर्शन पाहून आश्चर्यचकित झाल्याचं दिसून आलं. त्यांनी ट्विट करत सांगितलं की ,'जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर विरोधी पक्षांना 2019 नाही तर 2024 ची तयारी करायला हवी. यावेळी भारतात विरोधी पक्षांमध्ये असा एकही नेता नाही जो 2019 मध्ये मोदी आणि भाजपाशी टक्कर घेऊ शकेल. 
उत्तर प्रदेशातील मोदी लाट तज्ज्ञ आणि विश्लेषक कसे काय विसरले? हे छोट्या डबक्यातील तरंग नाही तर त्सुनामी आहे, असं ट्वीटही ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.
 
कुमार विश्वास यांनी पराभव मान्य करणार ट्विट केलं डिलीट - 
 मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने निकालाआधी सर्व उमेदवारांचे फोटो काढून मीडिया हाऊसेसना पाठवली होती. कुमार विश्वास यांना आम आदमी पक्षाच्या विजयाची पुर्ण खात्री होती. पण ज्याप्रमाणे निकाल हाती येऊ लागले त्यानंतर कुमार विश्वास यांचा विश्वास कमी होऊ लागला. पंजाबमध्ये आपला पराभव होत असल्याचं लक्षात आल्यानंतर कुमार विश्वास यांनी पराभव मान्य करणारी एक कविता ट्विट केली होती. पण थोड्याच वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. 
 

Web Title: 2019, otherwise prepare for elections in 2024 - Omar Abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.