...तर २0१९ मध्ये पाहून घेईन!, पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या खासदारांना भरला सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:47 AM2017-08-11T03:47:09+5:302017-08-11T03:47:12+5:30
‘संसदेत सभागृहाचे काम चालू असताना तुम्ही गैरहजर राहूच कसे शकता? तुम्ही हजर राहावे, यासाठी वारंवार व्हिप का बजवावा लागतो? खासदार झालात म्हणजे तुम्ही स्वत:ला समजता काय? जे काही तुम्हाला मिळाले ते भाजपाने दिले आहे, हे लक्षात ठेवा.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : ‘संसदेत सभागृहाचे काम चालू असताना तुम्ही गैरहजर राहूच कसे शकता? तुम्ही हजर राहावे, यासाठी वारंवार व्हिप का बजवावा लागतो? खासदार झालात म्हणजे तुम्ही स्वत:ला समजता काय? जे काही तुम्हाला मिळाले ते भाजपाने दिले आहे, हे लक्षात ठेवा.
आता पक्षाध्यक्ष अमित शहा राज्यसभेत आले आहेत. तुमचे मौजमजा करण्याचे दिवस संपले आहेत. यानंतरही तुम्ही वाटेल तसे वागलात तर २0१९ साली मी पाहून घेईन’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजपाच्या खासदारांना सज्जड दम दिला.
भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा रुद्रावतार पाहून भाजपाच्या अनेक खासदारांना घाम फुटला होता. बैठकीला पक्षाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित खासदार अमित शहा हेही उपस्थित होते.
का भडकले पंतप्रधान?
राज्यसभेत मध्यंतरी भाजपा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करणारे घटनादुरुस्ती आहे त्या स्वरूपात मान्य होऊ शकले नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या मतदानाच्या वेळी जे १४ खासदार गैरहजर होते. त्यातील दोघे भाजपाचेही होते.
याखेरीज गुजरातेत राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या तिसºया उमेदवाराचा पराभवही मोदी व शहा यांना बºयापैकी झोंबला आहे. पंतप्रधानांनी या तिन्ही घटनांची दखल घेतल्याचे जाणवले होते.