राम मंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मिळाले उद्घाटनाचे निमंत्रण; VIP यादीत नावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:46 AM2024-01-19T11:46:41+5:302024-01-19T11:47:11+5:30

२२ जानेवारी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील व्हिआयपींना निमंत्रण देण्यात आले आहे.

2019 supreme court verdict on ayodhya dispute 5 judges invited in ram mandir pran pratistha inauguration ayodhya | राम मंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मिळाले उद्घाटनाचे निमंत्रण; VIP यादीत नावांचा समावेश

राम मंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मिळाले उद्घाटनाचे निमंत्रण; VIP यादीत नावांचा समावेश

२२ जानेवारी होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील व्हिआयपींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. या निमंत्रणाच्या यादीत आता ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना निमंत्रण देण्यात आले आहे. 

व्हिआयपींच्या ५५ पानांची यादी समोर आली आहे, या यादीत अयोध्येतील २२ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या व्हीआयपी आणि प्रसिद्ध लोकांचा उल्लेख आहे. या यादीत सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पाच न्यायाधीशांच्या नावाचाही समावेश आहे, या न्यायाधीशांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. राममंदिर-बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती त्यांना २२ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. यात माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद अरविंद बोबडे, अशोक भूषण, एस. अब्दुल नजीर तसेच सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या नावाचाही समावेश आहे.  

राम मंदिर-बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, २.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामललाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन भारत सरकारने नंतर स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता.

न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र ५ एकर जमीन देण्यास सांगितले होते, जेणेकरून बोर्ड मशीद बांधू शकेल. हा ऐतिहासिक निकाल या पाच न्यायाधीशांनी दिला होता.

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देशातील चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवसांच्या अनुष्ठानावर आहेत.

Web Title: 2019 supreme court verdict on ayodhya dispute 5 judges invited in ram mandir pran pratistha inauguration ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.