2019 मध्ये मोदींच्या विजयाची किल्ली योगींच्या हाती

By admin | Published: March 20, 2017 12:22 PM2017-03-20T12:22:33+5:302017-03-20T12:22:33+5:30

नवनियुक्त सरकार कशा प्रकारे आश्वासनांची पूर्तता करते त्यावर 2019 लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील भाजपाचे यशापयशाचे गणित अवलंबून असणार आहे.

In 2019, the Yogi's key to the victory of Modi | 2019 मध्ये मोदींच्या विजयाची किल्ली योगींच्या हाती

2019 मध्ये मोदींच्या विजयाची किल्ली योगींच्या हाती

Next

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले असले तरी, पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कसोटी लागणार आहे. नवनियुक्त सरकार कशा प्रकारे आश्वासनांची पूर्तता करते त्यावर 2019 लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील भाजपाचे यशापयशाचे गणित अवलंबून असणार आहे. 
 
काय आहे योगी आदित्यनाथ यांच्या समोरील आव्हाने 
 
- उत्तरप्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने दिलेले सर्वात मोठे आश्वासन म्हणजे शेतक-यांची कर्ज माफ करणे. उत्तरप्रदेशात सत्ता आल्यानंतर आपण शेतक-यांची कर्जे माफ करु असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रत्येक निवडणूक प्रचारसभेत देत होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी योगी सरकारला 85 हजार कोटींची तरतुद करावी लागेल आणि सध्या उत्तरप्रदेशचा खजिना रिकामा आहे. 
 
- भाजपाने दिलेले दुसरे मोठे आश्वासन म्हणजे कत्तलखाने बंद करण्याचे. राज्यातील 126 कत्तलखाने बंद करणे अशक्य असल्याचे जाणकरांचे मत आहे. केरळनंतर बीफ निर्यात करणारे उत्तरप्रदेश देशातील दुसरे राज्य आहे. कत्तलखाने बंद करणे मोदी आणि योगी दोघांसाठी अशक्य आहे कारण देशाला महत्वाचे परकीय चलन निर्यातीमधून मिळते. 
 
- साखर शेतक-यांची देणी हे उत्तरप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांसमोर तिसरे मोठे आव्हान आहे. उत्तरप्रदेशात शुगर लॉबी मजबूत आहे. सरकारने साखरेचे  आधार मुल्य आणि धोरणे अनुकूल ठरवावीत यासाठी शुगर लॉबीकडून सत्ताधारी पक्षाला मोठया प्रमाणावर देणगी दिली जाते. ऊसाची मळी आणि इथेनॉल विकून हे कारखाने रग्गड नफा कमावतात. या साखर कारखानदारांनी शेतक-यांची देणी थकवली आहेत. ही रक्कम 6 हजार कोटींच्या घरात आहे. सरकारने कारखानदारांना शेतक-यांची देणी देण्यासाठी भाग पाडले नाही तर, मोठे आंदोलन उभे राहू शकते. 
 
- कायदा-सुव्यवस्था आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार ही सुद्धा योगी सरकारसमोरची मोठी आव्हाने आहेत. मुख्यमंत्रीपदी निवड होताच शपथ घेण्याआधी योगींनी पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान दिले होते. 
 
- उत्तरप्रदेशमध्ये दररोज 2 हजार मेगावॅट वीजेची कमतरता आहे. 24 तास सर्व घरांमध्ये वीज उपलब्ध करुन देण्याचे योगींसमोर आव्हान आहे. पायाभूत सेवा सुविधांच्या कमतरतेमुळे उत्तरप्रदेशात उद्योजक गुंतवणूकीत फार रस दाखवित नाहीत. 

Web Title: In 2019, the Yogi's key to the victory of Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.